गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

संजय लिला भन्साळी, रणवीर सिंगवर अदखलपात्र गुन्हा wajed khan rajesh khadke

Add caption

संजय लिला भन्साळी, रणवीर सिंगवर अदखलपात्र गुन्हा

(16 Oct) पुणे, १६ ऑक्टोबर (हिं.स.) : भोर येथील राजवाडा येथे बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान वकिलाला धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील वाजेद खान (बीडकर) (रा. चंदननगर, खराडी) यांनी यासंबंधी भोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज दुपारी ॲड.वाजेद खान हे त्यांच्या वकिलीच्या कामानिमित्त भोर येथील तहसील कार्यालयात गेले होते. त्यानंतर त्यांना भोर येथील राजवाड्यातील वीज बिल भरणा केंद्रात काम होते. परंतु त्याचवेळी बाजीराव मस्तानी चित्रपटाचे तेथे चित्रीकरण सुरू होते. पडदा वर करून ॲड.खान आतमध्ये जात असताना संजय लीला भन्साळी त्यांच्यावर जोरात ओरडून म्हणाले, ऐ काले कोट वाले तुम्हारा जो काम है वो बाद मे करना, तर अभिनेता रणवीर सिंग याने ॲड.खान यांना सुरक्षारक्षकांना सांगून बाहेर हाकलून देण्यास सांगितले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना धक्काबुक्की करून बाहेर हाकलले. या प्रकारानंतर ॲड.खान यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ